दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये सागरी स्वच्छते संबंधी उद् बोधन.
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ अभियाना अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी केल्या जाणाऱ्या सागरी स्वच्छते संबंधी उदबोधन कार्यक्रम दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. सकाळी 11 ते 12.30 पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे यांनी सागर किनाऱ्याच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगून 17तारखेला करावयाच्या कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच 17तारखेच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले.
ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. कु. निशिगंधा बंदरकर, प्रा. नेत्रांजली महाडिक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.