दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज – निसर्ग मंडळाकडुन पक्षी तीर्थतयार करुन चिमणी दिन साजरा.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या या रौप्यमहोत्सवीवर्षी निसर्ग मंडळामार्फत सामाजिक बांधिलकी जपत जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. आपल्या परिसरात विविध पक्षी वावरत असतात. हे पक्षी आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्या निमित्त 20 मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून जग भरात पाळला जातो.
माणसाच्या सहवासात वसाहत करून राहणाऱ्या चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. वाढती लोकसंख्या, झाडांची बेसुमार कत्तल, सिमेंटची घरेआणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलच्या टॉवर मधून निघणारी विषारी किरणे, ही त्याची मुख्य कारणे आहेत.
चिमणी चे अस्तित्व पृथ्वी तलावरून नष्ट झाल्यास पर्यावरणासोबतचसजी वसृष्टीही धोक्यात आणल्या शिवाय राहणार नाही. शहरातील केबलवायर, मोबाईलमुळेप क्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर व मानसिकतेवर परिणाम झालेला असूनही चचिमण्या कमी होण्याची मुख्य कारणे असल्याचे संशोधकांचेमत आहे. उन्हाळा सुरू झाला की पाण्यासाठी पक्ष्यांचीआर्तहाक सर्वांना ऐकायला मिळते. त्यामुळे महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बोटॅनिकल गार्डनमध्ये मातीची पसरट भांडे ठेवून पक्षी संवर्धनाचा संकल्प केला.
या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘ टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून पक्षांसाठी दाणापाणी ठेवण्यासाठी भांडी कशी तयार करावी ‘, याचे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.
तसेच प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे यांनी या प्रसंगी ‘पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घरी व आजूबाजूच्या परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहनही केले. उद्घाटन प्रसंगी निसर्गमंडळाच्या प्रा. नंदा जगताप, सदस्यसुजितटेमकर, ग्रंथपाल कीर्ती परचुरे, प्रा. श्रुती आवळे हे उपस्थित असुन त्यांनी परिसरामध्ये विविध ठिकाणी पक्षी तीर्थ ठेवून पक्षीसंवर्धना चा संदेश दिला. या कार्यक्रमाची व्यवस्था शिक्षकेतर कर्मचारी महेश चव्हाण यांनी पाहिली.