दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेसंबंधी ओरिएंटेशन.
दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम संबंधी ओरिएंटेशन कार्यक्रम दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलुख यांनी राष्ट्रीय सेवा योजना या विभागाची विस्तृत माहिती प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिली. तसेच या विभागमार्फत वर्षभर केल्या जाणाऱ्या नियमित उपक्रमांसंबंधी तसेच विशेष निवासी शिबिरासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. कु. निशिगंधा बंदरकर, प्रा. नेत्रांजली महाडिक तसेच विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल हांडे, सानिका डोळस, निशांत तासकर यांनी विशेष मेहनत घेतली.