दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजतर्फे ‘इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’ विषयावर व्याख्यान
दापोली – दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा-केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रा. मिली पॉल या वक्त्या म्हणून लाभल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जगातील शेअर बाजारातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देत विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कशाप्रकारे बचत व गुंतवणूक करावी तसेच गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याविषयी समर्पक चर्चा व्याख्यानामध्ये घडवून आणली. महेक पठाण, उमेर फाकी व नुहीद मिरकर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्यांशी सदर विषयावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चा केली. त्यातून शेअर बाजार व तेथे घडून येणारी कार्ये यांचे महत्त्व सहभागी श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.
मुस्कान पटेल या वाणिज्य विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने याप्रसंगी आभार-प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संदेश जगदाळे , उपप्रचार्य डाॅ. घनश्याम साठे तसेच प्रा. ज्योती चोगले, प्रा सिद्धी साळगावकर, प्रा. ऋजुता जोशी , प्रा. श्रद्धा खूपटे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या आयोजन समितीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मदत केली.