दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
आज दि २२ मार्च २०२२ रोजी दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांना असोसिएशन ऑफ नॉन गव्हरमेंटल कॉलेज, डॉ. शिवारे (प्रेसिडंट) यांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
सदर शिष्यवृत्ती आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असून या वेळेस एकुण१५ विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते तेजस्वी तांबे, श्रद्धा झाडेकर, अक्षता खळे, जावेरिया महेस्कर, तेजल तांबे, साक्षी कासारे, मुनझ्झा खुडुपकर, सफा हसबा, राज आयरे, भुवन चोगले, अक्षय शिगवण, मिहीर गोलांबडे, आकाश विटमल, ऋषिकेश कोटलुक्कर, प्रतीक म्हातले या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कार्यलयीन कर्मचारी आणि विद्यार्थी-शिक्षक कल्याण मंच या समितीतील सर्व सदस्यांचा मोलाचा वाटा होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थी-शिक्षक कल्याणमंचाच्या समन्वयक प्रा. श्राव्या पवार यांनी केले