दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ विज्ञान दिनाचे ‘ औचित्य साधून प्राणिशास्त्र विभागातर्फे दापोलीतील विविध प्रशाला, पालक आणि सामान्य नागरिकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्राणी, विद्यार्थ्यांनी बनविलेले आकर्षक प्रकल्प, संकलित केलेले किटक इ. अगदी जवळुन पाहता आले. तसेच या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध प्राण्यांची माहितीही सांगितली.
या विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधुन दापोली एज्युकेशन सोसायटी चे कार्यवाह डॉ. प्रसाद करमरकर आणि प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते ‘ झुमीआम्ही ‘ भित्तीपत्रकाचे अनावरणही करण्यात आले.
तसेच ए. जी हायस्कुल, सोहनी विद्यामंदिर , ज्ञानदिप इ . अनेक प्रशाला व दापोलीतील सर्व सामान्य नागरीकांनी या विज्ञान प्रदर्शनालाभ घेतला.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी या प्रदर्शनाच्या समन्वयक प्रा. नंदा जगताप, प्रा. रोहिणी नाईक , प्रा.स्वाती देपोलकर, सुजीत टेमकर आणि प्राणि शास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहेनत घेतली. या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मोरे यांचे मार्ग दर्शन लाभले.