दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये निसर्ग मंडळातर्फे बिया संकलन उपक्रम
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील निसर्ग मंडळ विभागातर्फे ‘ बिया संकलन ‘ उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण जतन व संवर्धन या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जांभुळ, बहावा, फणस, आपटा, शेवगा इत्यादी अनेक वनस्पतींच्या बिया तसेच कडधान्यांचे विविध ‘ वाण ‘ देखील या उपक्रमातून संकलित केलेली आहेत.
या शिवाय या उपक्रमा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना बिया कशा रुजवाव्यात, बियां पासून रोपटी कशी तयार करावीत, याचीही माहिती दिली जाणार असून महाविद्यालयामध्येच संकलित बिया रुजवुन रोपे तयार केली जाणार आहेत.
या प्रसंगी सर्व सामान्य नागरिकांनी ही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा व संकलित केलेल्या बिया महाविद्याल याच्या प्राणिशास्त्र विभागात जमा कराव्यात , असे आवाहन निसर्ग मंडळाच्या समन्वयक प्रा. नंदा जगताप यांनी केलेले आहे.