दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये आयुष मंत्रालय, भारत सरकार द्वारा ‘औषधी वनस्पतींचे निशुल्क वाटप ‘ कार्यक्रम संपन्न
‘आजादी काअमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियान अंतर्गत ‘आयुष आपके द्वार’ या उपक्रमाचे आयोजन
दि. ५ मार्च २०२२ रोजी दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभाग, एन. एस. एस. आणि वनस्पती शास्त्र विभाग – सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य श्री. प्रसाद फाटक यांनी भुषविले.
सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलुख यांनी प्रमुख पाहुणे डॉ. मंदार अक्कलकोट
सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय ; आयुषमंत्रालय, भारतसरकारचे प्रमुख संशोधक व रिजन डायरेक्टर म्हणून कार्यरत प्रा. डॉ. दिगंबर मोकाट आणि इतर मान्यवरांची ओळख करुन दिली.
तदनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आपल्या मनोगतातुन उपक्रमाचा हेतु विशदकरित असे सांगितले की , या उपक्रमातुन ७५ व्या अमृत महोत्सवाअंतर्गत ७५ लाख माणसांपर्यंत पोहोचुन औषधी वनस्पतींचे निशुल्क वितरण करित जनजागृती केली जाणार आहे.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे डॉ. मंदार अक्कलकोट यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत माहिती देऊन या अभियाना अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची कोविड १९ च्या प्रादुर्भावातील उपयुक्तता सांगितली.
त्यानंतर भारत सरकार चे प्रमुख संशोधक व रिजनल डायरेक्टर प्रा. डॉ. दिगंबर मोकाट यांनी आपल्या व्याख्यानातून वनस्पती लागवडी मधुन संशोधन व रोजगार प्राप्ती कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शित केले.
तर दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य श्री. प्रसाद फाटक यांनी भारतस रकारच्या ,’ आयुष आपके द्वार ‘ या उपक्रमास संस्थेत र्फेसहाय्य करण्याचे आश्वासन देऊन उपक्रमास आपल्या मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.
याकार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये विविध औषधी वनस्पतींचे निशुल्क वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेन्द्र मोरे, महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी व वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . रघुनाथ घालमे, कार्यक्रमस मन्वयक डॉ. विक्रम मासाळ तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.