दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘रोटीडे ‘ उत्साहात साजरा करण्यात आला…
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मधील निसर्ग मंडळातर्फे २१ फेब्रुवारी रोजी ‘ रोटीडे ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.
या ‘ रोटीडे’ चे औचित्य साधून दापोलीतील इंदिराबाई बढे कर्णबधीर विद्यालय, दापोली आणि आनंद फाऊंडेशन संचलित दिव्यांगशाळा, जालगाव या कर्णबधीर प्रशालांना प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली.
या प्रसंगी प्रशालेतील मुलांना कोरड्या खाऊ, किराणा सामान, दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तूंचे वाटप महाविद्यालयात तर्फे करण्यात आले.
सदर उपक्रमासाठी या सर्व वस्तू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःहून संकलित केल्या होत्या तर त्यामध्ये काही शिक्षक कर्मचाऱ्यांचाही आपला मदतीचा हात दिला.
स्वागत समारंभ प्रसंगी कर्णबधीर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मादुसकर यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाबाबत कौतुक व्यक्त केले.