दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये आयुष मंत्रालय, भारत सरकार द्वारा ‘औषधी वनस्पतींचे निशुल्क वाटप ‘
‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियान अंतर्गत ‘आयुष आपके द्वार’ या उपक्रमाचे आयोजन
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पतीशास्त्रविभाग आणि एन. एस. एस.तर्फे करण्यात आलेले आहे.
या उपक्रमाचे आयोजक वनस्पतीशास्त्र विभाग –
सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय असून या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयामध्ये औषधी वनस्पतींचे निशुल्क वाटप होणार आहे.
सदर कार्यक्रम ५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयामध्ये संपन्न होणार असून याप्रसंगी आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांना औषधी वनस्पतींची आवश्यकता असल्यास त्यांनी त्वरित महाविद्यालयास भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केलेले आहे.
सदर कार्यक्रमास प्रा. दिगंबर मोकाट, दापोली एज्युकेशन सोसायटी कार्यवाह डॉ, प्रसाद करमरकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती राहील.