दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये दीक्षांत व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन..
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये दि ११ फेब्रुवारी २०१९ रोजी दीक्षांत व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाविद्यालयात चौथा दीक्षांत समारंभ असून यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयास बोर्ड ऑफ स्टुडीस चे चेअरमन, मुंबई विद्यापीठातील विज्ञान विभागाचे मुख्याधिकारी तसेच कर्जत कॉलेज चे प्राचार्य डॉ आर जी देशमुख यांची महत्वपूर्ण उपस्तिती लाभणार आहे.
या दीक्षांत समारंभ एकूण २०३ विद्यार्थी पदवी देण्यात येणार असून यात प्रमुख्यानं बी स सी विभागातील १०२, बी कॉम विभागातील ३६ पदवी प्राप्ती होणाऱ्या पदवीधर विद्याथ्यांचा समावेश आहे. तसेच पद्युत्तर विद्याथान मध्ये वनसंपत्ती शास्त्र , प्राणी शास्त्र, रसायन शास्त्र या विषयांतील msc विभागातील एकूण ६५ विद्याथान चा समावेश आहे.
या समारंभाचे प्रतिनिधित्व महाविद्यालय तर्फे डॉ विक्रम मसाला हे करत आहेत. दीक्षांत व बक्षीस वितरण सोहळा ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाचता सभागृहात होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी समारंभात उपस्तित राहण्याचे आवाहन महाविद्यालय तर्फे केले आहे.