दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये पदवी आणि पदवीयुत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु…
यंदाच्या २०१९ – २० शैक्षणिक वर्षात विद्यापीठाचे वेळा पत्रक आणि आदेशा नुसार १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदवीयुत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे.
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये प्रवेश घेणाऱ्याविद्यार्थ्यांना प्रामुख्याने पदवीधर अभ्यासक्रमात – विज्ञानशाखा (Science ) आणि वाणिज्य शाखा (commerce) यांमधील विषयांमध्ये शिक्षण घेता येईल. (Graduation in science ) विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी –
१. वनस्पतीशास्त्र (botany)
२. प्राणीशास्त्र (zoology)
३. रसायनशास्त्र (chemistry)
४. भौतिकशास्त्र (physics)
५. सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology)
६. संगणकविज्ञानशास्त्र (Computer science)
अशा प्रामुख्याने ६ विषयांचा समावेश आहे.
पदवीधर अभ्यास क्रमानंतर पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रमात (Masters) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना –
१. रसायनशास्त्र ( Chemistry ) ,
२. वनस्पतीशास्त्र (Botany),
३. प्राणीशास्त्र ( zoology)
४. पर्यावरणशास्त्र (Environmental science)
अशा एकुण ४ विषयांमधुन अध्ययन करता येईल. तसेच विद्यार्थी या महाविद्यालयात संशोधनअभ्यासक्रम ( P.H.D. ) यामध्ये रसायनशास्त्र (Chemistry ) किंवावनस्पतीशास्त्र (Botany) यादोनविषयांमधुनपुर्णकरुशकतो. पदवीधर, पदवीव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमातील विषय विद्यापीठ अधिकृत शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार महाविद्यालयात घेण्यात येतात.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यां सहे महाविद्यालय इतर कोणत्याही अभ्यासक्रमातील प्रवेशास अडथळा आणत नाही. त्यांना No Objection Certificate (N.O.C.) लगेच देण्यात येते. ” विद्यापीठाच्या आदेशा नुसार व वेळापत्रका अनुसार प्रवेश प्रक्रिया पुर्ण न झाल्यास
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अपुर्ण राहु शकते याची पालकांनी नोंद घ्यावी “, असे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे. यांनी केले आहे.
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज इच्छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लवकरात लवकर प्रवेश घेण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी कृपया महाविद्यालयास भेट द्यावी अथवा कार्यालयात त्वरित संपर्क साधावा, ही विनंती