दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा……
दापोली शिक्षण संस्थेच्या दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये महिला विकास कक्षा तर्फे दापोलीच्या भागवत हॉस्पिटलमधील आहारतज्ञ प्रलोभना देवरुखकर यांनी व्याख्यानातुन पॉवर पॉईन्ट प्रेझेनटेशन द्वारे उपस्थित विद्यार्थींनींना आहाराचे महत्त्व पटवुन दिले. तसेच स्त्रियांसाठी योग्य आहार घेणे आवश्यकच आहे आणि त्यास कोणतीही वयोमर्यादा नाही , असेही प्रलोभना देवरुखकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या.
व्याख्यानात महिलांच्या विविध टप्प्यांवर असणाऱ्या जबाबदाऱ्या व त्या पेलण्यासाठी लागणारे आहारातील विविध घटक यांचेही विवेचन करण्यात आले. औषध गोळ्या इ. घेण्याऐवजी घरातील संतुलित आहारातुन मिळणाऱ्या उपयुक्त घटकांबद्द्लही माहिती देण्यात आली. तसेच नैसर्गिक फळे भाज्या, व घरगुती पदार्थांच्या नियमित सेवनाचे महत्त्व ही विशद करण्यात आले. आहारा बरोबरच नियमित व्यायाम , भरपुर पाणी पिणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार किंवा औषध उपचार करणे या गोष्टींचाही त्यांनी उहापोह केला.
जागतिक महिला दिना निमित्त व्याख्यान देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या प्रलोभना देवरुखकर या याव्ह महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी असुन कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी पुष्पगुच्छ देउन त्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील विद्यार्थीनी वेगवेगळ्या करियरच्या वाटा निवडुन त्यात यशस्वी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद ही व्यक्त केला. आणि व्याख्यानाच्या विषयाचे महत्त्व सांगुन उपस्थित विद्यार्थींनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. किर्ती परचुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. नंदा जगताप , प्रा. प्रिया करमरकर , प्रा. स्वप्नाली पोंक्षे , प्रा. अश्विनी रेमजे , प्रा. पुनम पाटिल , सानिया नागुठणे , साकिब वालेले , कादर मेमन ,प्रशांत कांबळी , पुजा तोडणकर मंडपे मोहिमी , सुशांत जाधव , प्रकाश शिगवण यांनी मेहेनत घेतली.