दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे समुद्र किनारा स्वच्छता अभियान
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे मुरूड समुद्र किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
भारत सरकारच्या ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ या अभियानांतर्गत दिनांक २०/०९/२०२५ रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचा एन. एन. एस. विभाग आणि मुरूड ग्रामपंचायत, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात अंदाजे 400 ते 500 किलोग्राम प्लास्टिक, पाणी बॉटल, काचेच्या बॉटल व इतर घनकचरा संकलित करण्यात आला आणि त्याची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज लाड, डॉ. विजय गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकारी डॉ. ज्योती चौगले, प्रा. नेत्रांजली महाडिक, प्रा. सुजित टेमकर तसेच मुरूड ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री. सुरेश तुपे, ग्रामस्थ प्रा. विश्वेश जोशी उपस्थित होते. या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन यशस्वीरीत्या अभियान राबविण्यात मोलाची कामगिरी बजावली. या स्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुरूड ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि इतर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
