दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्रा. सदानंद डोंगरे यांचे सेट परीक्षेत सुयश..
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सदानंद डोंगरे यांनी जून मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी म्हणजेच सेट या परीक्षेत संगणक शास्त्र या विषयातून सुयश संपादन केले आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी राज्यपातळीवर दरवर्षी सेट या परीक्षेचे आयोजन केले जाते. प्रा. डोंगरे 2014 सालापासून दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये कार्यरत असून त्यांनी संगणक शास्त्र तसेच माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

