दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या पूजा पोतकर यांचे सेट परीक्षेत उज्ज्वल यश..
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या पीएच. डी. च्या विद्यार्थिनी पूजा पोतकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी अर्थात सेट या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी राज्य पातळीवर दरवर्षी सेट या परीक्षेचे आयोजन केले जाते. दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्रा. पोतकर या सध्या डॉ. घनश्याम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली Ph. D. साठी संशोधन करीत आहेत. सेट परीक्षेतील त्यांच्या यशाबद्दल दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ प्रसाद करमरकर, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

