दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या संजना पाटील यांचे सेट परीक्षेत उज्ज्वल यश….
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या पीएच. डी. च्या विद्यार्थिनी संजना पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी म्हणजेच सेट या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी राज्य पातळीवर दरवर्षी सेट या परीक्षेचे आयोजन केले जाते. संजना पाटील यांनी दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयातच रसायनशास्त्र विषयामधे पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्या डॉ. गंगा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. साठी संशोधन करीत आहेत.
सेट परीक्षेतील त्यांच्या यशाबद्दल दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

