दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात रंगनाथन जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थित ग्रंथालय समितीचे प्रमुख प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनीही प्रतिमेला वंदन करून पुष्पांजली वाहिली. त्यानंतर ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे यांनी आपल्या भाषणात डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे विचार आजही कसे प्रेरक आहेत, आणि ग्रंथालयात लावलेले ग्रंथप्रदर्शन हे त्यांच्याच तत्त्वांचा एक भाग असल्याचे सांगितले. या जयंतीनिमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे आणि एन्सायक्लोपिडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच एन्सायक्लोपिडिया ऑफ इकॉलॉजी अँड एनवायरमेंट सायन्स यांचे खंड प्रदर्शित केले होते.
दि. 12आणि 13 अशा दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साही प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी प्रा. संतोष मराठे, डॉ. बापू यमगर यांच्यासह ग्रंथालय परिचर ओमकार पड्याळ यांनी मेहेनत घेतली.