दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आयेशा खोत हिची निवड.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाची निवड होऊन त्यातून तृतीय वर्ष विज्ञानची विद्यार्थिनी आयेशा खोत हिची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एकमुखाने निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन अशा तिन्ही विद्याशाखांच्या प्रत्येक वर्गातून मेरिट नुसार एक तसेच एन. सी.सी., स्पोर्टस इ विविध विभागातून त्यांचे प्रतिनिधी याप्रमाणे विद्यार्थी निवडून दरवर्षी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ तयार होते. यावर्षी या मंडळामध्ये 25 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी एकमताने आयेशा खोत हिची महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. आयेशाने अभ्यासाबरोबरच विविध वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून महाविद्यालयाला चमकदार यश मिळवून दिले आहे. तिच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने, नेतृत्व गुणाने आणि मनमिळावू स्वभावाने तिचा विद्यार्थी प्रतिनिधी पदापर्यंतचा मार्ग सुकर झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, युवा महोत्सव प्रमुख प्रा. डी. डी. कुलकर्णी, IQAC प्रमुख डॉ. आर. एल. घालमे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी आयेशाचे अभिनंदन केले आहे.