दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजची उडान महोत्सवात बाजी
मुंबई विद्यापीठाच्या डी.एल.एल.ई. (आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन उडान महोत्सवाच्या रत्नागिरी विभागातील फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स कॉलेज ने दोन पारितोषिके पटकावली आहेत.
रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेज येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत नियती भळगट, अनिषा वर्मा, दीप्ती लोंढे, जिज्ञासा घाग, पूजा जाधव, सुजल जैन, राज आयरे, भुवन चोगले, हृषिकेश जाधव, स्वरुप तांबे, सुजल वाघजे, शुभम लोवरे, ओंकार जाधव यांच्या संघाने द्वितीय तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत अनिषा वर्मा हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा.डाॅ.गंगा गोरे, प्रा.श्रद्धा खुपटे, प्रा.श्राव्या पवार, प्रा.विश्वेश जोशी, प्रा. अनिकेत नांदिस्कर व प्रा. निशिगंधा बंदरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर पथनाट्य कॉलेजचा माजी विद्यार्थी जयवंत काटकर याने दिग्दर्शित केले होते. या यशासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी यांसह सर्व संचालक तसेच प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.