दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये बक्षीस वितरण आणि दीक्षान्त समारंभ संपन्न.
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये यंदा ४ था दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. समारंभास मुंबई विद्यापीठातील विज्ञान शाखेचे प्रमख उध्दिष्टता श्री डॉ आर जी देशमुख यांची मुख्य उपस्तीथी लाभली दापोली शिक्षण सावंतथा चे उपाध्यक्ष श्री मजलेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला .या प्रसंगही महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी दापोली एजुकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज च्या यशस्वी वाटचाल व भाषणातून कौतुक हि व्यक्त केले. सर्व प्रथम महाविद्यालयाकचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला ज्यामध्ये विज्ञान शाखेतील पदवीधर अब्यासक्रमात शिकणाऱ्या तीन हि वर्षातील आजी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावर्षी महाविद्यालयाचा निकाल विज्ञान शाखेत ७९.२७% लागलेला असून वाणिज्य शाखेचा निकाल ८१.२५% लागलेला आहे. प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ‘गोपाळ नारायण मेहता शिष्यवृत्ती ‘, ‘श्री दत्तात्रय ग्यानबा कोकाटे शिष्यवृत्ती ‘,’डॉ. दाटराय गोपाळराव भापकर शिष्यवृत्ती’,तसेच ‘के माधव केशव करमरकर पारितोषिक’,के. विनायक सदाशिव सहस्रबुद्धे पारितोषिक इ. विविध शिष्यवृत्या व पारितोषिक देण्यात आली. ‘विद्याथ्यांच्या’ शिक्षणास हातभार व प्रोहत्साहन मिळावे यासाठी दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज आणि त्यास हातभार लाविणाऱ्या विविध सस्था नेहमीच तत्पर असतात हे यातून दिसून येते. बक्षीस वितरण सोहळ्यात डॉ. आर. जी . देशमुख यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार हा पूरसाकार कु.सानिया लियाकत नगुथने हिला प्राप्त झाला. दीक्षान्त समारंभात एकूण २०३, बीकॉम विभागातील ३६, स्थानकांचा समावेश आहे. महाविद्यालयाचा यंदाचा २०१८ या शैक्षणिक वर्षात M.SC विभागाच्या ८४.७२% निकाल लागला.