दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ज्योती आनंदराव चौगले यांना पी.एच. डी प्रदान
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख प्रा. ज्योती आनंदराव चौगले ( सौ.ज्योती अभिजित दिंडे) यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा. चौगले यांनी ‘ comparative study of customer satisfaction of postal and banking services with special reference to Ratnagiri district’ या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध शिवाजी विद्यापीठात सादर केला होता. या संशोधनासाठी डॉ. एम. एम. अली हे त्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
डॉ. चौगले यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपले पती डॉ. अभिजित दिंडे, बहीण विद्या चौगले आणि इतर कुटुंबीय यांसह दापोली एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि इतर सर्व सहकारी यांना दिले आहे.
डॉ. चौगले यांच्या या यशासाठी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे आणि सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.