दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त सेमिनारचे आयोजन.
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एक ते सात ऑक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हेच औचित्य साधून दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग आणि वनविभाग, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह सेमिनार आयोजित करण्यात आले. यामध्ये पहिल्या सत्रात दापोली वनविभागाचे अधिकारी श्री प्रकाश पाटील यांनी दापोली परिसरात आढळणारे वन्यजीव, त्यांचे संरक्षण, त्याविषयीचे कायदे, कुठले प्राणी आपण घरात पाळू शकतो याविषयी सखोल माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात कासवांचे बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या, अंजर्ले आणि वेळास येथील कासव संवर्धन संस्थेचे समन्वयक मोहन उपाध्ये यांचे ‘कासवांचे संवर्धन आणि संरक्षण’ या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी कासवांची माहिती सांगताना गेल्या वर्षी कोकण किनारपट्टी वरील कासवांना उपग्रह ट्रांस्मिटर बसवण्यात त्यांचे असणारे योगदान आणि अडचणी याविषयी विवेचन केले.
सेमिनारच्या तिसऱ्या सत्रामध्ये दापोली तालुक्यात सर्पमित्र म्हणून काम करणारे श्री किरण करमरकर, तुषार महाडिक, मिलिंद गोरीवले, अक्षय गोंधळेकर, मयूर चव्हाण यांनी दापोलीमध्ये आढळणारे साप आणि त्यांच्या विषयीच्या अंधश्रद्धा याविषयी मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राणीसंरक्षण यावर पथनाट्य सादर केले.
सदर सेमिनारसाठी वनविभाग दापोली मंडणगड परिक्षेत्रा मधील श्री. पी. जी. पाटील – वनपरिक्षेत्र अधिकारी, दापोली, श्री. मोहन उपाध्ये – कासव संवर्धन मोहीम सदस्य, श्री. सतपा सावंत – वनपाल दापोली, श्री. अनिल दळवी – वनपाल मंडणगड याच बरोबर वनरक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री. गणपत जलने, श्री. जगताप, शुभांगी भिलारी, शुभांगी गुरव हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. जी. बी. साठे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. नंदा जगताप, प्रा. सुजित टेमकर, प्रा. स्वाती देपोलकर, प्रा. ऐश्वर्या महाजन यांनी प्रयत्न केले