दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात परीसस्पर्श योजनेअंतर्गत कार्यशाळा.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाची रत्नागिरी जिल्ह्यातील NAAC मानांकन न मिळालेल्या महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक ( मेंटोर ) महाविद्यालय म्हणून शासनाने निवड केली आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या सभागृहात 19 ऑक्टो. रोजी परिस स्पर्श या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
महाविद्यालयाच्या आय.क्यू. ए. सी. तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि डॉ. अयुब शेख, IQAC cluster, India हे लाभले होते. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे प्रा. कैलास गांधी, डॉ. घनश्याम साठे, प्रा. संतोष मराठे, डॉ. विक्रम मासाळ, डॉ. गंगा गोरे, डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. नंदा जगताप, डॉ. बापू यमगर यांनी NAAC च्या विविध पैलू संबंधी मार्गदर्शन केले. यामध्ये खेड, चिपळूण इ. तालुक्यातून 19 महाविद्यालयातील एकूण 47 जणांनी सहभाग घेतला. यात 36 प्राध्यापक, 8 प्राचार्य आणि 3 संस्थाचालक यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली नागवेकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी IQAC चे समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी सर्वांचे आभार मानले.