दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजची बाजी मुंबई विद्यापीठ युवा सांस्कृतिक महोत्सव 2019-20
दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५२ व्या युवा
सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम फेरीत वादविवाद कथाकथन आणि व्यंगचित्र या प्रकारांत बक्षिसांना गवसणी
घातली. या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालयाने एकुण ४ पैकी ३ प्रकारांत आपले नाव कमावले आहे.
यावर्षी सांस्कृतिक महोत्सवात एकुण २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला होता.
त्यामधुन दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मराठी वादविवाद स्पर्धेत –
आदित्य रिसबुड , स्वरांगी निंबाळकर व इंग्रजी वादविवाद स्पर्धेत तेजस मेहता याने जान्हवी दिवेकर हिच्या
साथीने प्रथम क्रमांक मिळवला. कथाकथन स्पर्धेत रुखसार ममतुले , व्यंगचित्र रेखाटनात मुस्कान चिपळुणकर
यांनी प्रथम क्रमांक मिळवले.
याव्यतिरिक्त वकृत्व स्पर्धेत सानिया नागुठणेकर व तेजस मेहता यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. शिल्पाकृती
स्पर्धेत हृतिक संकुलकर याने द्वितीय व रांगोळी स्पर्धेत भक्ती कालेकर या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक
मिळवला. समुह गीत गायनात नीळकंठ गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी – हम करे राष्ट्र आराधन व
पयल नमने ही गीते सादर केली
व नाट्य या विभागात जयंत काटकर यांच्या दिग्दर्शना अंतर्गत ” वीट ” या विषयावर नाटिका सादर
करुन
दोन्ही विभागात महाविद्यालयाने उत्तेजनार्थ बक्षिस मिळवले.
महाविद्यालयाच्या स्थापने २३ वर्ष झालेली असुन १० पेक्षा अधिक वर्षे सांस्कृतिक युवा महोत्सवात आपली
उत्तम कामगिरी बजावत एक उच्चांक गाठला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे ,
शिक्षण अभ्यासेतर उपक्रम समितीचे प्रमुख प्रा. संतोष मराठे , सांस्कृतिक उपक्रमाच्या प्रमुख प्रा . श्रध्दा खुपटे
व प्रा. अजिंक्य मुलुख , प्रा. विश्वेश जोशी , प्रा. अनिकेत नांदिसकर , प्रा. प्रिया करमरकर इ. शिक्षकवर्गाचे
मार्गदर्शन लाभले. संचालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.