दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये” विज्ञान मंडळाचे ” उदघाटन
दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी दापोली अर्बन बँक सिनअर सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. सुधाकर आगरकर आणि डॉ. जयंत बांदेकर यांची उपस्थिती होती.
सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक जागृती व्हावी व संशोधनासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे , या हेतुने
विज्ञान मंडळाची स्थापना झालेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यान , विज्ञान जागर ( DES
Inspire ) व उपक्रम घेतले जातात. विज्ञान मंडळाचे उद्घाटन व विज्ञान विषयक भित्तीपत्रकाचे अनावरण डॉ.
सुधाकर आगरकर यांनी केले. यादिवशी डॉ. सुधाकर आगरकर यांचे रसायन शास्त्रातील या
विषयावर व्याख्यान झाले. तसेच डॉ. जयंत बांदेकर यांनी
जीवतंत्रज्ञान याविषयावर विद्यार्थ्यांशी सखोल संवाद साधला. ज्ञानाची देवाण घेवाण संशोधनास प्रवृत्त करते
आणि भारतातील तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग घ्यावा , हे मौलिक आव्हान
डॉ. सुधाकर आगरकर यांनी करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या उदघाटन प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळाचे
सदस्य सौरभ बोडस , महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रवींद्र बागुल , महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. संदेश जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर
कर्मचारी यांनी समिती प्रमुख प्रा. संतोष मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय प्रयत्न केले.