दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज चे राष्ट्रीय सेवा योजनेचे (N.S.S) शिबीर उत्साहात पार पडले. कांदिवली या दत्तक गावी या शिबिराचे उदघाटन दापोली शिक्षण सौस्थेंचर चेअरमन श्री. केदार साठे व संचालक मंडळ सदस्य कांदिवली गावाचे सरपंच श्री. रवींद्र मांडवकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्तितीत दि २९ डिसेम्बर २०१८ रोजी झाले.
या शिबिरात एकूण ४ वनराई बंधारे बांधण्यात आले. ग्रामदेवता मंदिर परिसरात स्वस्थता रस्तादुरुस्ती कांदिवली प्राथमिक केंद्रशाळा परिसर स्वच्छता, ग्राम परीक्षण अशी अनेक कामे करण्यात आली. या शिबिरात दरम्याने योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या सहकार्याने दन्त तपासणी शिबिराची घेण्यात आले. दि ३ जानेवारी २०१९ रोजी महिला हळदीकुंकू व रात्री बहारदार सांस्कृतिक कारेक्रम सादर केला.
शिबिराच्या समारोप दि ४ जानेवारी २०१९ रोजी मान्यवरांच्या उपस्तितीत झाला. या प्रसंगी कॉलेज चे प्राचार्य डॉ संदेश जगदाळे उपस्तित होते.