तुमच्या उद्यासाठी आपला आज देण्याचा सैनिक – सौ. अनुराधाप्रभु देसाई दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये.
19 डिसेंबर 2019 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहांमध्ये देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूर
सैन्यदलांचा विविध पैलूंविषयी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या
अनुभवांविषयी चित्तथरारक व प्रेरणादायी दृकश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या
व पाहुण्या म्हणून सौ. अनुराधा प्रभुदेसाई यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. संजय
जगदाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयातील 150 विद्यार्थी व इतर श्रोते गण उपस्थित होते.
या दृकश्राव्य कार्यक्रमामध्ये विविध चित्रफितीच्या माध्यमातून अनुराधा प्रभुदेसाई यांनी भारतीय त्रिदलाचे
शौर्य, भारतीय लढाया, त्यांचे घटनाक्रम व सरहद्दीवरील परिस्थितीचे हृदयद्रावक वर्णन केले. अनुराधा
प्रभुदेसाई यांनी कारगिल येथे दिलेल्या भेटीनंतर स्वयंप्रेरित होऊन ' लक्ष फाउंडेशनची' स्थापना २००९
साली केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधुन त्यांनी ' तरुण पिढीने पुढाकार घेऊन समाजात सुधारणा
करावी आणि सरहद्दीवरील सैनिकांचे पांग फेडावे,' असे प्रेरित वक्तव्यही केले. तरुणांचे प्रबोधन व
मार्गदर्शन करणारे विविध कार्यक्रम दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेजमध्ये नेहमीच होत असून
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या वेळी ' एक सशक्त व सुदृढ समाज घडवणारी पिढी ' महाविद्यालयातून
बाहेर पडेल यात वाद नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया करमरकर यांनी केले आणि कार्यक्रम
यशस्वीरित्या संपन्न झाला.