कु. मानसी शिगवण हिची रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघात निवड
दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०२२ रोजी देवरूख येथे घेण्यात आलेल्या पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या कु. मानसी मधुकर शिगवण या विद्यार्थिनीची रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघात यशस्वीरित्या निवड झालेली आहे.
पुढील राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धा ठाणे येथे २८फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. मानसी शिगवणच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे,
क्रीडा विभाग प्रमुख प्रा.वर्षा धामणे, प्रा. शंतनू कदम, प्रा. नंदा जगताप, प्रा. अनिकेत नांदिस्कर, प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. प्रीती बोरजे, प्रा. प्रियांका साळवी श्री. सुजीत पवार , यांनी तिचे मन:पुर्वक अभिनंदन केले आहे.