कु. निशा गोडसे विद्यार्थिनीस पी.एच.डी पदवी प्राप्त …
दापोली, येथील मुंबई विद्यापीठ अंतर्गत पीएचडी संशोधनासाठी मान्यता प्राप्त दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या सहकार्याने कु.निशा गोडसे या विद्यार्थिनीने ‘ वनस्पतीशास्त्र विषयात – औषधोपचारासाठी उपयोगी वांशिक वनस्पतींच्या प्रजातींचे प्रमाणीकरण’ यावर नुकतीच 30 एप्रिल रोजी पी.एच.डी ही पदवी प्राप्त केली.
या विद्यार्थीनीस संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे हे लाभले.
या संशोधना अंतर्गत विद्यार्थिनी निशा गोडसे हिला उटी व कोइंबतूर मधील निलगिरीच्या वनांमध्ये प्लेक्ट्रॅनथस प्रजातीच्या काही औषधी वनस्पतींचा शोध लागला, ज्यांच्यामधील ‘ लीनोलॉल’ नावाच्या संयुगामुळे त्यांचा उपयोग त्वचारोग व कर्करोगावरील उपचारांसाठी
प्रभावीपणे करता येण्याची दाट शक्यता आहे, हे अभ्यासा अंतर्गत दिसुन आले.
तसेच ही औषधी वनस्पती बहुउपयोगी असून आपल्या आवारास मच्छरांपासून ही दूर ठेवते. जेणेकरून मच्छरांपासून होणाऱ्या विविध रोगांपासून आपले रक्षण होऊ शकते. जैवविविधतेने नटलेल्या आपल्या देशातील अशा अनेक औषधी वनस्पतींचे प्रमाणीकरण होऊन त्यांचा उपयोग वैद्यकीय उपचारासाठी करण्यात यावा, हा या संशोधनाचा मुख्य हेतू होता.
या प्रबंधावर आधारित तोंडी परिक्षा ३० एप्रिल रोजी देशातील विख्यात शास्त्रज्ञ व मेंगलोर विद्यापीठातील
उपयोजित वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. राजू कृष्णा सी व डॉ. दिगंबर मोकाट (प्र. पाठक विद्यापीठ) यांनी घेतली असुन याप्रसंगी रिझवी कॉलेचे डॉ. नितेश जोशी हे या परिक्षेचे चेअरमन होते.
या विद्यार्थिनीस या संशोधनासाठी महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र पि. एच. डी. विभागातील डॉ. विक्रम मासाळ व डॉ.रघुनाथ घालमे व इतर शिक्षकांचेही उत्स्फूर्त मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या संशोधनाच्या यशस्वीते बाबत संस्था संचालकांनी महाविद्यालय व विद्यार्थिनी निशा गोडसे हिचे कौतुक केले आहे.