‘ उडान महोत्सव स्पर्धां मध्ये ‘ दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
दापोली,
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागात घेण्यात आलेल्या ‘ उडान महोत्सव २०२१-२२ ‘ च्या स्पर्धां मध्ये दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
सदर उडान महोत्स व ऑनलाइन पद्धतीने ८ ते १० मार्च २०२२ या कालावधीत घेण्यात आला.
या उडान महोत्सवातील ५पैकी ३ स्पर्धां मध्ये अव्वलयेत पारितोषिके प्राप्त करीत महाविद्यालयाने आपल्या अव्वल येण्याची परंपरा राखली आहे.
या मध्ये दिव्या केळकर या विद्यार्थीनीने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक , क्रिएटिव्हीटी रायटींग या स्पर्धेत मुस्कान चिपळुणकर हिने द्वितीय क्रमांक तर सांघिक पोवाडा गायन स्पर्धेत गट प्रमुख सायली पवार तसेच सहभागी विद्यार्थी – ऋजुता साळुंखे, प्रतीक्षा जाधव, आकांक्षा शिंदे, प्रणोती पवार, प्रसाद मोरे, तेजस पाटे, मयुरेश देपोलकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच डि. एल. एल. ई. विभाग समन्वयक डॉ. गंगा गोरे,समिती सदस्य प्रा. शंतनू कदम, प्रा. सुजित टेमकर, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. नेहा मुंडेकर, प्रा. रेश्मा देवरुखकर, प्रा. श्राव्या पवार यांचे विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळाले आहे.