इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागाचे सुयश!!*
वाणिज्य विभागातील नियती भळगट, तुबा वसगरे, रोझमीन तसबी या विद्यार्थिनींनी प्राध्यापिका ऋजुता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेझेंट केलेल्या रिसर्च पेपरला 23 मार्च रोजी झालेल्या “Revival Strategies and Business Policies for Sustainability and Development” या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये Best Paper of the conference (students category) या पारितोषिकाने गौरविण्यात आले.
क्रिप्टो करंसी, सायबर क्राईम्स इन बँकिंग सेक्टर , रिलेशनशिप बिटवीन सर्विस क्वालिटी अँड कस्टमर सॅटीस्फॅक्शन, स्मार्ट प्रॅक्टिसेस टू इंक्रीस मोटिवेशन, इम्पॅक्ट ऑफ covid-19 ऑन टुरिझम अशा विविध विषयांवर वाणिज्य विभागाच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी रिसर्च पेपर प्रेझेंट केले.