आविष्कार रिसर्च कन्व्हेशनमध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या
विद्यार्थ्यांनी १४व्या आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय आविष्कार रिसर्च कन्व्हेशनमध्ये नेत्रदीपक
कामगिरी केली. एकूण ५ बक्षिसे मिळवून विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकावर येत महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांनी आविष्कार रिसर्च कन्व्हेशनमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. महाविद्यालयापासूनच
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये मनाली देसाई ,
सानिया नागुठणे, विशाखा म्हस्के , हनिफा मेमन या विद्यार्थ्यांनी प्रा. दिपाली दिवाण, प्रा. श्रेया जंगम
, प्रा. प्रियांका साळवी , प्रा. पुनम पाटील, प्रा. गंगा गोरे या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम
शोधनिबंध प्रस्तुत केले.
यावर्षी अविष्कार रिसर्च कन्व्हेशन २०१९ चे महाविद्यालयातील समन्वयक प्रा. बापू यमगार हे असून
संस्थेचे संचालक सदस्य व प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना
पुढील भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.