आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा..
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘तज्ञाद्वारे योगप्रात्यक्षिक व योगमार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन पतंजली योग शिक्षक व अखिल भारतीय योग असोसिएशनचे सदस्य असलेले पराग केळसकर यांनी केले. पराग केळसकर यांच्या समवेत पतंजली योग शिक्षक नंदकुमार शिगवण व निलीमा बुटाला यांनी आपली उपस्थिती नोंदवली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 67 मुली व 33 मुले यांनी आपला सहभाग नोंदवला.
पतंजली योग शिक्षक पराग केळसकर यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे फायदे पटवून सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनात दररोज योगसाधना केल्याने विविध आजारावर आपण कसे विजय मिळवू शकतो याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. शरीर व मन एकत्र बांधून ठेवण्यासाठी योगसाधना कशी उपयुक्त आहे याचे महत्व पटवून दिले.
पतंजली योग शिक्षक नंदकुमार शिगवण यांनी वेगवेगळ्या आसनांची प्रात्यक्षिके दिली. त्याच बरोबर प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
निलीमा बुटाला यांनी शीर्षसन, हलासन, मत्स्यासन, बकासन, धनुरासन, चक्रासन यासारखी आसन करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून करून ही घेतली
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक निधी भडवळकर यांनी केले. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. नंदिनी जगताप, प्रा.सिद्धी साळगावकर, प्रा.प्रियांका साळवी, प्रा. शंतनू कदम, श्री. सुजित पवार यांनी प्रयत्न केले.