आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्राध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागाचे सुयश
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे.
सर्वप्रथम वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी नियती भळगट, तुबा वसगरे, रोझमीन तसबी यांनी प्रा. ऋजुता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रिव्हायव्हल स्ट्रॅटरजीज ॲन्ड बीझनेस पॉलीसीज फॉर सस्टॅनीबीलीटी ॲन्ड डेव्हेलपमेन्ट ‘ या विषयावर २३ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये आपला शोध निबंध प्रस्तुत केला आणि ‘परिसंवाद चर्चासत्रातील सर्वोत्तम शोध निबंध ‘ या पारितोषिकाचे मानकरी ठरले.
सदर परिसंवाद चर्चासत्रामध्ये क्रिप्टो करंसी, सायबर क्राईमस इन बॅंकिंग सेक्टर, रिलेशन शीप बीटवीन सर्विस क्वॉलिटी ॲंन्ड कस्टमर सॅटीसफॅक्शन, स्मार्ट प्रॅक्टीसेस टु इंक्रिझ मोटीव्हेशन, इंपॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन टुरिझम, अशा विविध विषयांवर वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी शोधनिबंध प्रस्तुत करुन भरीव कामगिरी केली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक सदस्यांनी महाविद्यालयाच्या यशाचे कौतुक केले असुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संशोधक प्रवृत्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहीत केले असुन पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.