आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्राध्ये दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर सर्वोत्तम शोध निबंधांचे प्रस्तुतीकरण करुन पारितोषिके प्राप्त करण्यात यश मिळविलेले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थीनींनी प्रकल्पावर तयार केलेल्या शोधनिबंधांची निवड देवरुख येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट ॲंड सस्टॅनिबीलीटी, या आंतरराष्ट्रीय परिसंवाद चर्चा सत्रामध्ये ‘ करण्यात आलेली आहे.
सदर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये अल्फिया ममतुले, तहुरा परकार, मुस्कान लोखंडे या विद्यार्थीनींनी
‘ अ प्रॉमिसिंग रिझल्ट ऑबटेन बाय मेजरमेंट बाय कोलोरी मीटर सॉफ्टवेअर ऑफ स्मार्ट फोन ‘ या विषयावर तसेच विद्यार्थीनी स्नेहा शेट्टी, नुपुर रेवाळे, सेजल मोहिते यांनी ‘ प्रिपरेशन ऑफ कोबॉल्ट, झिंक फेराईट्स बाय सोल जेल मेथड ‘, याविषयावर शोधनिबंध प्रस्तुत केले होते.
सदर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी, प्रकल्प मार्गदर्शक विश्वेश जोशी, प्रा. अनिकेत नांदिस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक सदस्या यां.नी महाविद्यालयाच्या यशाचे कौतुक केले असुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संशोधक प्रवृत्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहीत केले असुन पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.