अग्निशमन आणि संरक्षण क्षेत्रात करियरचे व्याख्यान संपन्न…
Dapoli urban bank senior science college मध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी अग्निशमन आणि संरक्षण
क्षेत्रातील करियरची संधी याविषयी व्याख्यान झाले. सदर व्याख्यानाचे आयोजन प्लेसमेंट सेल आणि
इन्टरनॅशनल कॉलेज ऑफ सेफ्टी मॅनेजमेंट, खेड यांनी संयुक्तरित्या केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी नॅशनल
फायर ॲन्ड सेफटी काउनसीलचे प्रमुख संचालक ललित यादव तसेच विजय मुलानी ,आकाश राय हे
सहाय्यक प्रशिक्षक , अभिजित पवार , कुंदन सातपुते इ. संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
खेड येथील इंडियन कॉलेज ऑफ फायर ॲन्ड सेफटी मॅनेजमेंट हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना ' फायर
ॲन्ड सेफ्टी याविषयी प्रशिक्षित करुन करिअरची नवीन संधी उपलब्ध करुन देणार आहे.
कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अग्निशमन दल , कंस्ट्रकशन , औद्योगिक कारखाने , डॉकयार्ड इ.
ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.
या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते (प्रशिक्षक) विजय मुलानी हे असुन त्यांनी विद्यार्थ्यांशी उद्योगांमध्ये होणारी
वृद्धी आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या जिवीताचे संरक्षण याविषयी सखोल संवाद साधला.
संरक्षण क्षेत्रातील विविध पदे व त्यांच्या महत्त्वपुर्ण कार्यांची ही त्यांनी माहिती दिली.
प्लेसमेन्ट सेल अंतर्गत ' संरक्षण अधिकारी ' या पदाचा देखील पदवीधर विद्यार्थ्यांनी आपले करिअर
निवडताना गांभीर्याने विचार करावा हा या व्याख्यानाचा मुख्य हेतु सफळ झाला. या व्याख्यानाचे
सुत्रसंचालन प्रा. सदानंद डोंगरे व अभिजीत पवार यांनी केले.